Psalms 41

मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र.

1जो माणूस गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे.
त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्याला वाचवेल.
2परमेश्वर त्याला राखेल आणि त्याला जीवंत ठेवेल.
आणि पृथ्वीवर आशीर्वादित होईल.
परमेश्वर त्याला त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही.
3तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्याला आधार देईल.
तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील.

4मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर.

माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले.”
5माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात,
“तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?”
6माझे शत्रू मला पाहायला आले असता तर ते व्यर्थपणच बोलतात.
त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते.
जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात.

7माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात,

ते माझ्याविरूध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात.
8ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो.
म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.”
9माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला.
पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे.

10परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभ कर.

म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेल.
11माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही,
यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस.
12मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतास,
आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस.

परमेश्वर, इस्राएलाची देवाची

अनादिकालापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो,
आमेन व आमेन.
13

Copyright information for MarULB